दाक्षिणात्य अभिनेत्रीने घेतला गळफास, मित्राविरोधात तक्रार दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मित्राच्या मानसिक त्रासाला कंटाळून दाक्षिणात्य अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हिने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ती 26 वर्षांची होती. हैदराबादच्या मधुनगर येथील राहत्या घरी बाथरूमध्ये लटकलेल्या अवस्थेत ती आढळली. याबाबत पोलिसांनी तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रावणीच्या कुटुंबीयांनी देवराज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. देवराज हा श्रावणीचा मित्र होता. परंतु तो तिला मानसिक त्रास देत होता. त्यानेच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. त्याच्या त्रासाला कंटाळून श्रावणीने टोकाचे पाऊल उचलले असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. श्रावणी कोंडापल्ली ही दाक्षिणात्य टीव्ही सृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होती. ‘मनसु ममता’ या टीव्ही मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या 8 वर्षांपासून श्रावणी टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे.