‘ही’ तेलगू अभिनेत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – तेलुगु अभिनेत्री श्री रेड्‍डी पुन्‍हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तिने प्रसिध्‍द दिग्‍दर्शक शिवा कोरटलाविषयी फेसबुकवर पोस्‍ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, कोरटला जगातील एक नंबरचा खराब चारित्र्य असणारा व्‍यक्‍ती आहे. जर मी माझ्‍या बायोपिकला परवानगी दिली तर हा माझ्‍या बायोपिकमधील महत्त्‍वाचा भाग असेल. मी झोपेतून उठल्‍यानंतरही हे नाव विसरू शकत नाही.. ते म्‍हणजे कोरटला शिवा… हो… तो कामसूत्रचा बॉस आहे. त्‍याने हे पहिल्‍यांदा केलेले नाही. आधीही त्‍याने प्रत्‍येक व्‍यक्‍तीला असे टारगेट केले आहे.’ रेड्‍डीच्‍या या वक्‍तव्‍याने चित्रपट इंडस्‍ट्रीत चर्चा होत आहे. याआधीही तिने सुरेश बाबूच्‍या मुलावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

श्री रेड्डीने अनेक तेलुगु स्‍टार्सवर कास्‍टिंग काउचचा आरोप केला होता. त्‍यावेळी ती चांगली चर्चेत आली होती. तेलुगू चित्रपट चेंबरच्‍या समोर टॉपलेस होऊन तिने आपला संतापदेखील व्‍यक्‍त केला होता. सुरेश बाबू यांच्‍या मुलावर शोषणाचा आरोप केल्‍यानंतर तिने मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरवर सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून निशाणा साधला होता.

रेड्डीने आपल्‍या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. पोस्‍टमध्‍ये तिने लिहिले होते, ‘एक रोमँटिक व्‍यक्‍ती ज्‍याला सचिन तेंडुलकर म्‍हणतात, जेव्‍हा हैदराबाद आला होता, तेव्‍हा एका चार्मिंग तरुणीने त्‍याच्‍यासोबत रोमान्‍स केला. हाय प्रोफाईल चामुंडेश्वर स्वामीने त्‍यात मिडल मॅनची भूमिका केली. महान व्‍यक्‍ती उत्तम खेळू शकतो. म्‍हणजे रोमान्‍स करू शकतो ?’ तसेच श्री रेड्डीने आपल्‍या फेसबुक पोस्टमध्‍ये ज्‍या ‘चार्मिंग गर्ल’कडे इशारा केला होता, ती तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्‍याचे म्‍हटले जात होते.