TDP चे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्‍का, ४ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

हैद्राबाद : वृत्तसंस्था – आध्र प्रदेशचे माजी मुख्यमत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाचे चार राज्यसभा सदस्य राजीनामा देऊन टीडीपी सोडणार आहेत. सुत्रांनुसार सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी मोहन राव आणि वायएस चौधरी हे टीडीपी सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

या चार नेत्यांनी टीडीपी सोडण्याची तयारी केली असून राजीनामा दिल्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. टीडीपीचे राज्यसभेत एकूण ६ सदस्य असून ४ सदस्यांनी पक्ष सोडला तर त्यांच्यावर पक्ष बदलाचा कायदा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला तरी ते राज्यासभेचे सदस्य राहू शकतात.

दरम्यान वायएस चौधरी यांनी ट्विट करून आपण भाजपामध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले आहे. एकीकडे चंद्राबाबू नायडू हे विदेशात कुटुंबासमवेत सुट्टी घालवत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. टीडीपीमधील ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य त्यांचा पक्ष सोडून भगवा झेडा हातात घेत आहेत.

निवडणुकीत टीडीपीचा पराभव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत टीडीपीला पराभवाचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत २५ पैकी केवळ ३ जागांवर टीडीपीला मिळाल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला होता. त्याचप्रमाणे विधानसाभा निवडणुकीत १७५ पैकी केवळ २३ जागा टीडीपीला मिळाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी निकालानंतर लगेच राजिनामा दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा