प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्यानं अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलगू टीव्ही मलिककेतील अभिनेत्री झांसी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियकरासोबर ब्रेकअप झाल्याच्या कारणावरून तिने आत्म्हत्येचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लोकप्रिय तेलगू मालिका पवित्र बंधन मध्ये झांसी भूमिका साकारत होती. मागील अनेक दिवसांपासून झांसी एका तरूणासोबत रिलेशनशिप मध्ये होती. काही कारणास्तव त्याने तिला लग्नासाठी नकार दिला. त्याच मानसिक धक्क्यातून तिने आत्म्हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. झांसी ने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सोसायटीच्या वॉचमॅनच्या लक्षात आली त्यानंतर त्याने ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिच्या घराचा तपास घेतला असता तिथे त्यांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. मात्र माध्यमांसमोर ही नोट अद्याप आणली नाही.

दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असून झांसी च्या फॅन्सना तसेच तिच्या मालिकेतील सहकाऱ्यांना तिची आत्महत्या हा मोठा धक्का आहे.