COVID-19 : ‘कोरोना’ झाल्यानंतर ढसा-ढसा रडली TV अभिनेत्री, ‘या’ कारणामुळं दिला स्वत:लाच दोष ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. अनेक सेलेब्स आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशात आता तेलगू टीव्ही अ‍ॅक्ट्रेस नव्या स्वमी हिनंही तिला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह अभिनेत्रीनं लोकांना दिला ‘असा’ सल्ला

नव्या स्वामीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत नव्या म्हणते, “मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. जसं मला कळालं मी लगेच डॉक्टरांसोबत कंसल्ट करून स्वत:ला आयसोलेट केलं. मी पूर्णपणे मेडिकेशनमध्ये आहे. माझी इम्युनिटी वाढवण्यासाठी मी चांगलं जेवण घेत आहे. मी सर्व जवळच्यांना आणि मित्रांना अपील करते की, जे कोणी मला गेल्या आठवड्यात भेटले आहेत त्यांनी स्वत:ला आयसोलेट करा. आणि कोरोना टेस्टही करून घ्या.”

अभिनेत्री म्हणाली, “या लाज वाटण्यासारखं काहीही नाही. घाबरण्याचंही काही कारण नाही. मला माहित आहे की, लोक वाईट साईट बोलतील. नकारात्मकतेपासून दूर रहा. तुम्हाला कोरोना झाला असेल तरी स्ट्राँग रहा. तुमच्या आशीर्वादानं मी चांगल्या प्रकारे रिकवर करत आहे.”

नव्यानं एका मुलाखतीत सागितलं, जेव्हा मला कळालं की, मला कोरोना झालाय, मी घरी जाताना खूप रडले होते. मी सकाळपर्यंत रडत होते. मला रात्री झोपही आली नाही. माझी आई अजूनही रडत आहे. मला गिल्टी वाटत होतं की, मी माझे क्रू मेंबर्स आणि कोस्टारला धोक्यात टाकलं.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like