शुटींगहून परतताना भीषण अपघात ; २ अभिनेत्रींचा जागीच मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था  – शुटींगहून परतत असताना कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तेलगू इंडस्ट्रीमधील दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृत्यु झाला.

अनुषा रेड्डी आणि भार्गवी अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत. ही घटना बुधवारी विकाराबाद इथे घडली. हैदराबादमधील आपल्या आगामी प्रोजेक्टरचे शुटींग संपवून दोन्ही अभिनेत्री घरी परतत असताना हा अपघात झाला.

Image result for अनुषा रेड्डी आणि भार्गवी

हैदराबाद येथील शुटींग संपवून त्या चार अभिनेत्री आपल्या घरी कारमधून जात होत्या. त्यावेळी विकाराबाद येथे समोरुन आलेल्या ट्रकची धडक टाळण्यासाठी अभिनेत्रीने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सरळ समोरच्या एका झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की दोघींचा जागीच मृत्यु झाला. अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

तेलगु अभिनेत्री भार्गवी ही केवळ २० वर्षाची होती तर, अनुषा २१ वर्षाची. दोघीही तेलगु सिनेक्षेत्रात आपली ओळख बनवण्याच्या प्रयत्नात होत्या.

You might also like