राज्यात हुडहुडी ! 8.8 अंशांपर्यंत तापमान घसरले

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. मध्यतंरी थंडी जणू गायब झाली होती. आता दिवाळीनंतर पुन्हा ती परतली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच गुलाबी थंडीने पहाट उजाडली होती. दिवाळीनंतर गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. आज राज्यभरात 8.8 अंशांपर्यंत तापमान खाली आले होते. परभणीमध्ये 8.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु, थंडीमुळे कोरोनाची पुन्हा मोठी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये ११. १डिग्री, परभणी १०. ६, परभणी कृषी विद्यापीठ ८. ८, पुणे ११. ५ , सांताक्रूझ १८. ४, जळगाव १२. ६, बारामती ११. ९, औरंगाबाद १३. ०, गोंदिया १०.५, नागपूर १२.४ एवढे किमान तापमान नोंदविले गेले.

गेल्या आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या थंडीनंतर अचानक तापमानात अचानक वाद झाली. मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशांवर गेले होते. तापमानातील वाढीमुळे ऐन दिवाळीत थंडी गायब झाली होती. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते १९ अंशांच्या आसपास गेले हाेते.