Temperature in Maharashtra | थंडी गायब होणार? राज्यात तापमान वाढीचा अंदाज; विदर्भातील थंडीची लाट ओसरणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर भारतात थंडीची लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात देखील किमान तापमानात (Temperature in Maharashtra) वाढ झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी किंचित गारवा (Cold) कमी झाला आहे. येत्या तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. खरंतर अशा प्रकारची थंडी रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक असते. मात्र उत्तरेकडील हवामान बदलामुळे राज्यातील थंडीची लाट (cold wave) ओसरली आहे. (Temperature in Maharashtra)

 

विदर्भातील थंडीची लाट (Vidarbha cold wave) बुधवारीही कायम होती. परंतु या विभागातही तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूर वगळता इतर रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले आहे. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा आदी राज्यांत तीन दिवस थंडीची तीव्र लाट आली होती. त्याचा परिणाम मध्य प्रदेश पाठोपाठ विदर्भात ही जाणवला.

 

राज्यात सर्वच भागात तीन ते चार दिवस रात्रीचे किमान तापमान सरासरी खाली जाऊन गारवा वाढला. विदर्भात किमान तापमानाचा (Temperature in Maharashtra) पारा सरासरीच्या तुलनेत 4 ते 8 अंशांनी घटल्याने या विभागात थंडीची लाट निर्माण झाली. मध्य प्रदेशच्या पूर्व भागात सध्या ही थंडीची लाट कायम असल्याने बुधवारी विदर्भातील तापमानाचा पारा घसरला होता. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आल्याने या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. सध्या राज्यात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती आहे.

पुण्यातील तापमानात वाढ
आज सकाळी पुण्यातील शिरुर (temperature in pune) याठिकाणी सर्वात कमी 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हवेली 11.6, पाषाण 12.1, एनडीए 12.6, आंबेगाव 12.6, इंदापूर 12.7, माळीण 12.7 आणि शिवाजीनगर 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी 13 ते 18 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

या ठिकाणी नीचांकी तापमान
राज्यात सर्वाधिक थंडी विदर्भात असली तरी, नीचांकी तापमान मध्य महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon) येथे 7.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
बुधवारी विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आदी भागांतील तापमानाचा पारा 8 ते 9 अंशावर होते.
कोकण विभागात रत्नागिरीत किमान तापमान अद्यापही सरासरी खाली आहे.
औरंगाबाद, परभणी, बीड आदी भागांत 10 ते 11 अंशांवर किमान तापमान होते.

 

 

Web Title :- Temperature in Maharashtra | disrupts statewide warming cold wave maharashtra vidarbha cold wave is also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Zero Waste Wedding Baramati | बारामतीत पार पडला कचरा विरहीत लग्नसोहळा

Food and Drug Administration Pune | …म्हणून पुण्यात वडापाव, पोहे किंवा अन्य खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून मिळणार नाही

Priya Banarjee | कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवण्यात ‘ही’ अभिनेत्री आघाडीवर