Temperature in Maharashtra | पारा वाढणार; महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Temperature in Maharashtra | राज्यात ढगाळ वातावरणामुळे उकड्यात वाढ झाली आहे. तर काही भागात तुरळक पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने कोकण (Konkan), गोवा (Goa)आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजपासून तीन दिवस कोकण, गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहणार आहेत. त्यामुळे उन्हाचा पारा आणखी वाढणार आहे. राज्याला (Temperature in Maharashtra) उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) तुरळक ठिकाणी गेल्या 24 तासात पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यासह मराठवाडा आणि विदर्भात (Marathwada And Vidarbha) हवामान कोरडे होते. विदर्भाच्या तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून दुसरीकडे कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात किंचित वाढ झाली. तर उर्वरित राज्यात सरासरीच्या जवळपास कमाल तापमान नोंदवण्यात आले. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. (Temperature in Maharashtra)

विदर्भातील अकोला 42.3 अंश सेल्सिअस, अमरावती 40.2, बुलडाणा 39.5, चंद्रपूर 40.8, गडचिरोली 36.2, गोंदिया 38, नागपूर 38.4, वर्धा 40, वाशिम 41, यवतमाळ 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पाऱ्याची उसळी – 

परभणीत 39.7अंश सेल्सिअस, पुणे 37.4, सोलापूर 39, ठाणे 39, उस्मानाबाद 38.9, नांदेड 39.4, नाशिक 37.8, मुंबई 33.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Temperature in Maharashtra | temperature in maharashtra to increase in coming days


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट

Ajit Pawar On MSRTC Workers Strike | ‘कामगारांना ही शेवटची संधी’; अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टच सांगितलं !

Sunny Deol Affair News | ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारच्या पत्नीसोबत होतं सनी देओलचं अफेअर

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी

Ajit Pawar On Junnar Leopard Project | ‘तो’ आरोप धांदात खोटा – अजित पवार