पुणे गारठले ! तापमान 8.2, नाशिकमध्ये सर्वाधिक कमी 6.6 अं.से. तापमान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यात थंडीने कालपासून प्रत्येकाला हुडहुडी भरली आहे. काल सायंकाळनंतर तापमान कमी होत गेले. रात्री थंडीचा जोर आणखी वाढला होता. पुण्यातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या तापमानाचा पारा 8.2 अं. से. पर्यंत घसरला आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 6.6 अं. से. तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मागील 24 तासांमध्ये तापमानाची झालेली नोंद पुढील प्रमाणे : मुंबई (कुलाबा) 14.5, सांताक्रूझ 11.4, अलिबाग 12.9, रत्नागिरी 14.1, डहाणू 14.5, पुणे 8.2, अहमदनगर 9.2, जळगाव 7.0, कोल्हापूर 14.5, महाबळेश्वर 10.0, मालेगाव 8.2, नाशिक 6.0, सांगली 14.0, सातारा 10.2, सोलापूर 15.7, औरंगाबाद 8.1, परभणी 12.7, नांदेड 11.5, बीड 13.3, अकोला 12.4, अमरावती 14.0, बुलढाणा 11.4, ब्रह्मपुरी 14.0, चंद्रपूर 16.2, गोंदीया 13.6, नागपूर 15.1, वाशिम 13.6, वर्धा 17.6, यवतमाळ 14.4 असे तापमान नोंदले गेले आहे.

राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे 6.0 अं. से. नोंदले गेले. त्या खालोखाल पुणे, मालेगाव आणि औरंगाबाद येथे कमी तापमानाची नोंद झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/