ऑस्ट्रेलियावरून परतल्यानंतर ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये होती मंदिरा बेदी ! ‘कोरना’ची बातमी ऐकून आला अस्थमाचा ‘अ‍ॅटॅक’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व जनता आपापल्या घरातच आहे. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मंदिरा बेदी ही देखील अलीकडेच ऑस्ट्रेलियातून आली आहे. सध्या मंदिरा घरात आहे. सध्या ती क्वारंटाईनमध्ये आहे. अलीकडेच तिला अस्थमाचा अटॅक आला होता.

मंदिरा आपल्या आरोग्याची कायमच काळजी घेत आली आहे. मंदिरानं अनेकदा तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ सोशलवलर शेअर केले आहेत. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत मंदिरानं सांगितलं की, वीमेन क्रिकेट वर्ल्ड कपमुळे ती ऑस्ट्रेलियात होती. 9 मार्चा 2020 रोजी ती परत आली आहे. तिनं सांगितलं की, ती सेल्फ आयसोलेशनमध्ये होती. ती फक्त दिवस मोजत होती. कोरोनाची लक्षणं 14 दिवसांनंतर दिसतात.

सतत कोरोनाच्या बातम्या पाहिल्यानंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे जी निगेटीविटी पसरली आहे त्यामुळं काही दिवसांपूर्वी तिला अस्थमाचा अ‍ॅटॅक आला होता. तिनं सांगितलं की, एक दिवस तिनं निगेटीव व्हिडीओ पाहिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिला अस्थमाचा अ‍ॅटॅक आला.

मंदिरानं लोकांना अपील केलं की, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांपासून दूर रहा. पॉझिटीव गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करा. निरोगी राहण्यासाठी रुटीन बनवा आणि वर्कआऊट करा असंही तिनं सांगितलं.

View this post on Instagram

Post show Mellow- Hellow!!!

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

View this post on Instagram

One for the road..

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

View this post on Instagram

Bye bye Bali ❣️

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

You might also like