लॉकडाऊन काळात दिला मदतीचा हात, ग्रामस्थांनी उभारले चक्क अभिनेता सोनू सूदचे मंदिर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात देशातील 28 राज्यातील हजारो परप्रांतीय कामगारांना मदत करून अनेकांची मने जिंकली. त्याच्या याच कार्यामुळे प्रभावित होऊन तेलंगणाच्या सिद्दीपीट जिल्ह्यातील डब्बा टांडा ग्रामस्थांनी सोनू सूदच्या मंदिराची स्थापना केली आहे.

ग्रामस्थांनी नुकतेच मंदिराचे उद्घाटन केले. सोनू सूदच्या उभारलेल्या पुतळ्यासमोर त्याची देवाप्रमाणे आरती व मनोभावे पुजा देखील करण्यात आली. यावेळी महिलांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून लोकगीते गायली. सिद्दीपेट जिला परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, अभिनेता सोूने सूदने कोरोना महामारीच्या काळात अनेकांसाठी मोठी मदत केली. त्यांच्या चांगल्या कृत्यांनेच आज जनतेच्या मनात देवाचे स्थान मिळवले आहे, म्हणून आम्ही त्याचे मंदिर उभारले आहे.

सोनूने लोकांना घरी पाठवण्याशिवाय इतरही गोष्टीत मदत केली आहे. सोनूने सरकारच्या मदतीशिवाय अनेक गावात रस्ते बनविण्यातही हातभार लावला आहे. सोशल मीडियावर सोनू सूद जास्तीत जास्त लोकांना प्रतिसाद देतो आणि त्यांची कामेही करतो. लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने स्वत: च्या पैशाने अनेक आजारी लोकांवरही उपचार देखील केले आहेत.