ट्रकला दिलेल्या धडकेत टेम्पोचालकाचा मृत्यु, बंगलुरु – मुंबई महामार्गावर अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुधाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाने पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यु झाला.

सतीश निवृत्ती पवार (रा. औदुंबर कॉलनी, हडपसर) असे चालकाचे नाव आहे. ही घटना मुंबई-बंगलुरु महामार्गावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

सांगली येथून दुध घेऊन चालक सतीश पवार हे टेम्पो घेऊन पहाटे पाचच्या सुमारास नऱ्हे येथे आले होते. त्यावेळी टेम्पोचालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व तो वेगाने पुढे असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. टेम्पोचा वेग इतका जोरात होता की अपघातात टेम्पोची संपूर्ण केबीन चक्काचुर झाली आहे. केबीनमध्ये सतीश पवार एकटेच होते. ट्रकचालकाने अपघाताची माहिती सिंहगड पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी केबीनमधून पवार यांना बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like