टेम्पो ट्रॅवलरमध्ये बसवत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाची वाट पाहात उभ्या असलेल्या महिलेला एकटी असल्याचे पाहून जबरदस्तीने टेम्पो ट्रॅवलरमध्ये ओढून नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने हाताला झटका देऊन आपली सुटका करून घेतली आणि पळ काढला. त्यानंतर महिला व तिच्या पतीने चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

रामानंद गणपत पाटील (२५, शिवशंभो नगर ) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. यासंदर्भात २० वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचा शहराच्या मध्यवस्तीत टेलरिंगचा व्यवसाय आहे. ती पतीला तेथे दुकानात मदत करते. दरम्यान ती कोंढवा येथे राहण्यास आहे. त्या शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेला घरी जायचे असल्याने ती शहरातून कात्रज डेपो येथे आली. त्यानंतर कोंढव्याकडे जाण्यासाठी ती रिक्षाची वाट पाहात उभी होती. त्यावेळी पाटील हा त्याची टेम्पो ट्रॅवलर घेऊन तेथून जात होता. त्याने फिर्यादी महिलेला पाहून टेम्पो उभा केला आणि कुठे जायचे आहे. असे विचारले. महिलेने सांगितल्यावर तिला कोंढवा येथे सोडतो असे सांगून ट्रॅवलरमध्ये बसवले.

त्यानंतर थोड्याच वेळात तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्या हाताला झटका देऊन तेथून पळ काढला आणि सुटका करून घेतली. त्यानंतर महिलेने तिच्या पतीला हा प्रकार सांगितला होता. ते शनिवारी कात्रज चौकात उभे असताना पाटील हा तेथे टेम्पो ट्रॅवलर घेऊन तेथे आला. त्यांनी पाटील याला पकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.

You might also like