राज्यातील 10 पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) राज्य पोलिस दलातील 10 पोलिस उपायुक्‍तांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्याचे आदेश निगर्मित करण्यात आले असुन 10 पैकी केवळ 2 पोलिस उपायुक्‍तांच्या पदस्थापनेबाबत आदेश देण्यात आले आहेत. इतर 8 पोलिस उपायुक्‍तांची बदली करण्यात आली आहे मात्र त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे आदेश निगर्मित करण्यात येणार असल्याचे गृह विभागाने काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’077de843-d218-11e8-9a26-2b9dcc4bdb94′]

राज्यातील 29 सहाय्यक पोलिस आयुक्‍तांना उपायुक्‍तपदी बढती

बदली झालेल्या पोलिस उपायुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे त्याबाबत पुढील प्रमाणे. संदीप भाजीभाकरे (अप्पर पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर-बदली आदेशाधीन ते पोलिस उपायुक्‍त, मुंबई शहर) आणि विशाल गायकवाड (अप्पर पोलिस अधिक्षक, नाशिक ग्रामीण ते अप्पर पोलिस अधिक्षक, रत्नागिरी). बदली झालेल्या इतर 8 पोलिस उपायुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात सध्या कोठे नियुक्‍ती आहे हे पुढील प्रमाणे. जयंत मीना (अप्पर अधिक्षक, अहमदनगर), श्रीमती पोर्णिमा प्रकाश चौगुले (पोलिस उपायुक्‍त, सोलापूर शहर-गुन्हे आणि विशेष शाखा), विवेक पानसरे (अप्पर पोलिस अधिक्षक, धुळे), विजय पवार (अप्पर अधिक्षक, सातारा), प्रशांत वाघुंडे (अप्पर अधिक्षक, अकोला), मितेश घट्टे (अप्पर अधिक्षक, रत्नागिरी) आणि प्रशांत खैरे (पोलिस उपायुक्‍त, मंत्रालय सुरक्षा, मुंबई). बदली करण्यात आलेल्या या 8 पोलिस उपायुक्‍तांच्या पदस्थानेबाबत स्वतंत्रपणे आदेश निगर्मित करण्यात येणार आहेत.

पुण्यातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या