देशातील ‘ही’ १० वारसास्थळे आता रात्री ९ पर्यंत पर्यटकांसाठी खुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील १० ऐतिहासिक वारसा स्थळे आता सकाळी सूर्योदयापासून रात्री ९ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अधिकाधिक स्मारके व इत्यादी वारसास्थळांचे दरवाजे पर्यटकांसाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच उघडे असतात. मात्र आता याची वेळ तीन तासांनी वाढणार असून पर्यटक रात्री नऊ वाजेपर्यंत या स्थळांना भेट देऊ शकतात.

यासंबंधीची अधिकृत घोषणा केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी सोमवारी संसदेत केली. त्यांनी म्हटले की या स्थळांमध्ये काही मंदिरे आहेत जे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. लोक रात्रीदेखील मंदिरात जातात त्यामुळे ही ठिकाणे संध्याकाळनंतर उघडी असणे गरजेचे आहे. हा बदल तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे.

याआधी राज्यांकडून वारंवार येणाऱ्या प्रस्तावावर चर्चा करताना या दोन मंत्रालयांनी स्थापन केलेल्या समितीने ३५ स्मारकांवर चर्चा केली होती ज्यांना सामान्य नागरिकांसाठी रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा प्रस्ताव होता. या समितीने पहिल्या टप्प्यात १० स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील स्थळांचा समावेश आहे – १) सफदरजंग मकबरा(दिल्ली) २) हुमायून मकबरा(दिल्ली) ३) राजा रानी मंदिर (भुवनेश्वर) ४) दूल्हादेव मंदिर, खजुराहो ५) शेख चिल्ली चा मकबरा, कुरुक्षेत्र ६) कर्नाटक मधील पट्टडकल स्मारक समूह ७) गोल घुमट, कर्नाटक ८) महाराष्ट्रातील मार्कंडा मंदिरांचा समूह ९) मान महाल, वाराणसी १०) गुजरात मधील राणीची बावडी

सध्या देशातील ऐतिहासिक वारशांमध्ये ताजमहाल सूर्योदयापासून (सकाळी ६ वाजल्यापासून) सूर्यास्तापर्यंत (संध्याकाळी ६ वाजपर्यंत) पर्यटकांसाठी खुला असतो. मात्र ताज महालाला देखील या सूचित स्थान मिळालेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –