एकाच जागी बसणं शरीरासाठी घातक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑफिसमध्ये अनेकजण एकाच जागी बसून राहतात. अनेक तास एकाच जागी बसणं शरीराच्या संरचनेसाठी चांगलं नाही. शरीराची जेवढी हालचाल होईल तेवढं आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. कामाच्या व्यापामुळे इच्छा नसतानाही अनेक तास एकाच जागी बसावं लागतं. त्यामुळे शरीरामध्ये स्टिफनेस येतो. यासाठी बसल्या जागीच किंवा ऑफिसमध्येच थोडा वेळ काढून थोडासा व्यायाम केला पाहिजे. यामुळे शरीराची हालचाल होईल.

बँक जॉब, डेस्क जॉब आणि इतर अनेक क्षेत्रांत अनेक तासांसाठी एकाच स्थितीत बसावं लागतं. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो तसेच इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. सतत बसून राहिल्याने हृदयरोग आणि डायबिटीज यांसारख्या अनेक आजारांचासामना करावा लागतो. काम करत असताना साधारणतः दर दोन तासांनी बसल्या जागीच उठून एक्सरसाइज करा. जर उठून जाणं शक्य नसल तर बसल्या बसल्याच एक्सरसाइज करा. यामुळे रक्तप्रवाह सुरू राहतो.

तळवे आणि टाचांचा व्यायाम करा. त्यासाठी तळवे किंवा टाचा क्लॉकवाइज आणि अ‍ॅन्टी- क्लॉकवाइज गोल-गोल फिरवा. खुर्ची मागे करून पायांनाही स्ट्रेच करा. मसल्स स्ट्रेच करा. जेव्हा आपण चालतो, त्यावेळी रक्त वरच्या दिशेला पंप होतं. मानेचाही व्यायाम करा. बसल्या-बसल्याच वरती पाहा आणि मान गोल-गोल फिरवा. दोन्ही हात वेस्ट लाइनवर ठेवून मागच्या दिशेला झुका. त्यामुले कंबरेचा व्यायाम होण्यास मदत होईल. दोन्ही खांदे मागच्या दिशेला झुकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही बाजूंना एक-एक करून झुका. दोन्ही हात उचलून खांद्यांवर ठेवा आणि कंबर फिरवा. यामुळे मसल्सचा व्यायाम होतो. हातांची मुठ वळा आणि उघडा, गोल-गोल फिरवून बोटांना स्ट्रेच करा.

जर शक्य असेल तर डेक्सटॉपऐवजी लॅपटॉप वापरा. डेस्कटॉपची जागा फिक्स्ड असल्याने डोळ्यांना त्रास होतो. यावर काही तासांसाठी एकाच स्थितीत काम करावं लागतं. त्यामुळे गरजेचं आहे की, स्क्रिन लेव्हल आयलेव्हलच्या बरोबर असावी. तसेच मान जास्त वरती करावी लागणार नाही याचीही काळजी घ्यावी. किबोर्ड टेबलवर ठेवण्याऐवजी किबोर्ड ट्रेमध्ये ठेवा. काम करताना कोपर आणि आम्र्सना रेस्ट द्या. यामुळे खांदे रिलॅक्स राहतात आणि त्यांच्यावर प्रेशर येत नाही. स्क्रिन डोळ्यांपासून लांब असेल तर उत्तम पण खुर्ची मात्र टेबलाच्या जवळ असणं गरजेचं असहे. हे डोळ्यांसोबतच हातांसाठीही फायेदशीर ठरतं.

Loading...
You might also like