राष्ट्रवादीचे १० आमदार ‘वंचित’च्या संपर्कात : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका आधी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला आणि लोकसभेत सर्वात जास्त चर्चेतहि राहिला. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय ते एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

आगमी विधानसभा निवडणूक लोकसभेप्रमाणे स्वबळावर लढवणार कि कोणाशी युती करणार याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अधिकृत घोषणा केली नाही. येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नावे न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यातील १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढविण्याची तयारी दर्शविल्याचे संकेतही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिले.

येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती काय असेल कोणाशी युती-आघाडी करणार, यासंदर्भातील भूमिका ७ जून रोजी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता ते युती करतात कि स्वबळावर लढतात हे चित्र काही दिवसातच स्पष्ट होईल.