home page top 1

गोव्यात काँग्रेसला झटका, दहा आमदारांच्या गटाचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकातील सत्तासंघर्ष सुरु असताना आता काँग्रेसला गोव्यात मोठा धक्का बसला आहे. काल रात्री गोव्यातील काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि काँग्रेसच्या इतर नऊ आमदारांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचे गोव्यात पंधरा आमदार असून यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पक्षांतरबंदी कायद्याचा या आमदारांना फटका बसणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण १० आमदारांनी एकसाथ प्रवेश केल्यामुळे हा कायदा लागू होत नाही. या सर्व आमदारांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने यातील कुणालाही आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार नाही.

हे आहेत दहा आमदार

१ बाबू कवळेकर
२ नीळकंठ हळणकर
३ इजिदोर फर्नांडिस
४ फिलीप नेरी रॉड्रिग्ज
५ फ्रान्सिस सिल्वेरा
६ टोनी फर्नांडिस
७ बाबूश मोन्सेरात
८ विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान
९ जेनिफर मोन्सेरात
१० क्लाफास डायस

हेच आमदार राहिले काँग्रेसमध्ये

१ माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे
२ लुईझिन फालेरो
३ रवी नाईक
४ दिगंबर कामत
५ अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स

दरम्यान, या नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच यातील काही आमदारांना मंत्रीपदे देखील मिळण्याची माहिती मिळत आहे. या आमदारांनी आपल्या स्वतंत्र गटाची नोंद केली आहे. त्यानंतर आता हे सर्व आमदार दिल्लीला गेले असून ते भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

Loading...
You might also like