नवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार आहे. याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सामाजिक क्षेत्रातल्या तज्ञ लोकांची आज बैठक घेतली . सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सामाजिक आणि इतर क्षेत्रासाठी काय पावलं उचलली पाहिजेत यावर त्यांनी चर्चा केली.

त्यानुसार सामाजिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी अर्थसंकल्पात मध्ये काय असायला हवं यासंदर्भात काही मुद्दे सुचवलेत ते पुढीलप्रमाणे:

१. शेती – शेतीतील उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल यासाठी प्रयत्न व्हावेत.

२. जमीन सुधारणा – जमीन सुधारणेच्या बाबतीत औद्योगिक क्षेत्रातून जमीन एकत्रीकरण आणि शेतीमध्ये खासगी क्षेत्रातून गुंतवणूक असे पर्याय सुचवलेत.

३. व्याज दर – बँकेच्या सेव्हिंग अकाउंटवर सर्वसामान्यांना जास्त व्याज दिले जावे. आर्थिक क्षेत्रातल्या प्रतिनिधींनीही अशीच मागणी केलेली आहे.

४. निर्यात क्षेत्रात बदल – निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात याव्यात. भारताची निर्यात वाढायला हवी.

५. संघटित आणि असंघटित क्षेत्र – असंघटित क्षेत्रालादेखील सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवेसाठी कामगारांना आरोग्य कार्ड देण्यात यावं

६. कर दरात कपात करण्यात यावी – भारतातील कॉर्पोरेट टॅक्स मध्ये कपात केली जावी.

७. शिक्षण आणि आरोग्य – आरोग्यावर GDP चा ३ टक्के आणि शिक्षणावर ६ टक्के खर्च व्हायला हवा. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर खर्च वाढवण्याचं सुचवलं गेलं. खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्कवाढीवर नियंत्रण हवं. FICCI ने सुचवल्याप्रमाणे ५ हजार ते २० हजार रुपये चेकअपवर कर सवलत हवी.

८. Dividend Distribution Tax (DDT) दरात कपात करण्यात यावी – DDT २० टक्क्यांवरून १० टक्के करावा.

९. व्यवहार मर्यादा वाढविण्यात यावी – इंडस्ट्रीकडून असं सुचवलंय की मर्यादा २ लाख म्हणजे खूपच कमी आहे. त्यात बदल करावा.

१०. आयकरात सूट हवी – आयकरात देखील किमान सूट हवी असेदेखील सुचवले गेले आहे.

११. अर्थसंकल्पाची वाटप पद्धती –  लोकसंख्येच्या आधारावर अर्थसंकल्पाचा वाटप व्हावं.

सामाजिक क्षेत्रातील लोकांनी हे बदल सुचवलेत खरे पण आता या सुचविलेल्या मुद्द्यांप्रमाणे बदल होतात कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सिनेजगत

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

 

Loading...
You might also like