दारू पाजली नाही म्हणून मित्राचा खून करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

उरण : पोलीसनामा ऑनलाईन

दारू पाजली नाही म्हणून या रागातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कातळपाडा चिरनेर येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपी सुनिल दत्तात्रय गोंधळी यास सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

[amazon_link asins=’B0785JJF7L,B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f16cb34-ab4c-11e8-a7f6-7797ede9cc66′]

खूप झालेल्या युवकाचे नाव शालीग्राम गजानन मुंबईकर असे असून तो उरण तालुक्यातील चिरनेर गावात राहात होता. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी सुनिल दत्तात्रय गोंधळी आणि शालीग्राम मुंबईकर यांची भेट झाली यावेळी सुनिल गोंधळीने शालिग्राम यास दारू पाजण्यास सांगितले. मात्र शालिग्रामने दारू पाजण्यास विरोध केल्याने आरोपी सुनिल गोंधळीने रागाच्या भरात शालिग्राम यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला होता. या घटनेची माहिती शालीग्रामच्या वडिलांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने चिरनेर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी आरोपी सनिल गोंधळी याच्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सेवलीकर यांच्या अखत्यारीत झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी यांनी काम पाहिले. यावेळी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली गेली. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, १ हजार कोटींची कामे करणार