सानिया मिर्झानं केवळ 4 महिन्यात कमी केलं तब्बल 26 किलो वजन, ‘व्हायरल’ झालं ‘ट्रान्सफॉर्मेशन’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सानिया मिर्झा आपल्या टेनिससाठी आणि फिटनेससाठी कायमच चर्चेत असते. सानिया नुकतीच आई झाली आहे. प्रेग्नन्सीच्या वेळेस सानियाचे वजन खूप वाढले होते. अर्थात ते साहजिकच होते मात्र प्रेग्नन्सीनंतर सानियाने आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली. पुन्हा मोठ्या प्रयत्नानंतर सानिया फिट झाली.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

सानिया सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी सानिया खूप मेहनत घेत आहे. याबाबतच्या अनेक पोस्ट सानियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून टाकल्या आहेत.

नुकताच सानियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सानिया कशा प्रकारे एक्सरसाईज करते हे पाहायला मिळत आहे. सानियाच्या फॅन्स कडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

मुलाच्या जन्मानंतर सानियाने अनेक महिने व्यायाम करून स्वतःला फिट बनवले आहे. याबाबतच्या अनेक पोस्ट तिने सोशल मीडियावरती टाकलेल्या आहेत. #MummaHustles असे कॅप्शन मध्ये लिहून सानियाने पोस्ट केलेला व्हिडीओ फॅन्स कडून चांगलाच शेअर होतोय.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

आपल्या सोशल मीडियावरून सानियाने सांगितले की, प्रेग्नन्सी वेळी वजन खूप वाढले होते मात्र अथक परिश्रमानंतर चार महिन्यात २६ किलो वजन कमी करण्यात यश आले आहे.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

सानियाने सांगितले की, यावेळी तीला अनेक प्रेग्नंट महिलांनी सल्ले दिले होते. तीही प्रेग्नेंट महिलांना सांगू इच्छिते की जर दिवसातील एक ते दोन तास महिलांनी व्यायामासाठी वेळ दिला तर त्याही वजन कमी करू शकतात.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

वजन कमी करणे एवढेही अवघड नाही असे सानिया सांगते. या बाबतचे सानियाने आपले फोटो देखील टाकले आहेत शिवाय त्यात तिने त्यावेळेसची वेळही सांगितली आहे.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

#MummaHustles हा हॅशटॅग वापरून सानियाने वजन कमी करण्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे.

सानिया मिर्जा ने 4 महीने में घटाया 26 किलो वजन, वायरल है ट्रांसफॉर्मेशन

Visit : policenama.com