काय सांगता ! होय, वॉलेटमध्ये 1700 कोटी रूपयांचे बिटक्वाइन ठेवून पासवर्ड विसरला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सॅनफ्रान्सिस्कोमध्ये एका प्रोग्रामरचे डिजिटल वॉलेटमध्ये 1700 कोटी रुपये अडकल्याने त्याची झोपच उडाली आहे. कारण त्याचे पासवर्ड विसरले आहे. त्याने ज्या कागदावर पासवर्ड लिहून ठेवला होता. तो कागदच हरवला आहे. जर त्याला हा पासवर्ड मिळाला किंवा आठवला तर तो अब्जाधीश बनू शकतो. अन्यथा त्याला अब्जो रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.

स्टीफन थॉमस असे या प्रोग्रामरचे नाव आहे. स्टीफनने काही वर्षांपूर्वी 7,002 क्रिप्टोकरन्सी बिटक्वाइन खरेदी केले होते. जे त्याच्या डिजिटल वॉलेटमध्ये पडलेले आहेत. आता या बिटक्वाइनची किंमत वाढून 1700 कोटी झाली आहे. पण स्टीफनसाठी हे अब्जो रूपये केवळ आकडे बनून राहिले आहेत. कारण तो एका पासवर्डनेच एक छोटी हार्डड्राइव उघडू शकणार आहे, ज्याला आयर्न म्हणतात. बिटक्वाइनची किंमत वाढताच त्याला त्याच्या संपत्तीची आठवण झाली. त्याने पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न केला. पण अडचण ही आहे की, तो केवळ 10 प्रयत्नच करू शकतो. त्यानंतर वॉलेट नेहमीसाठी लॉक होईल. त्याने आतापर्यंत 8 वेळा चुकीचे पासवर्ड टाकून वॉलेट उघडण्याचा प्रयत्न केला. आता केवळ 2 संधी शिल्लक आहेत. म्हणजे 2 चुका आणि 1700 कोटी रूपये फुर्र…

बिटक्वाइनची कोणतीही रेग्युलेटरी संस्था नाही, ना यावर कोणत्या कंपनीचे नियंत्रण आहे. त्यामुळे पासवर्ड तयार करण्यासारखी सुविधा नाही. या मुद्रेचा निर्माता सातोषी नाकामोटो नावाची व्यक्ती आहे. बिटक्वाइनची त्याची आयडिया होती की, कुठून डिजिटल अकाउंट उघडून बिटक्वाइन ठेवता येतील. ज्यावर कोणत्याही सरकारच किंवा संस्थेच नियंत्रण नसाव. पण ही व्यवस्था आता लोकांसाठी डोकेदुखीच कारण ठरत आहे.

10 लाख कोटीचे बिटक्वाइन लोकांनी गमावलेत
वॉलेट रिकवरी सर्व्हिस चेनालिसिस सांगते की, जगात 1.85 कोटी बिटक्वाईन आहेत. यातील 20 टक्के (10 लाख कोटी रूपये) त्यांच्या मालकांनी गमावले आहेत. ही कंपनी डिजिटल की मिळवून देण्यात मदत करते. त्यांच्या पासवर्ड रिकवरीसाठी रोज 70 फोन येतात. हे फोन गेल्या सहा महिन्यात तिपटीने वाढले आहेत. बिटक्वाइन ब्लॉग Chainalysis चा अंदाज आहे की, 5 बिटक्वाइनपैकी एक नेहमीसाठी हरवला आहे. या हरवलेल्या बिटक्वाइनची किंमत यावेळच्या भावानुसार साधारण 14 हजार कोटी डॉलर इतकी आहे.