CAA : पाकिस्तानमधून 10 वी आणि भारतातून 11 वी केली मात्र बारावीच्या परिक्षेला बसण्यावर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए कायद्याविरोधात देशभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवण्यात आला. मात्र त्यानंतर आता सीएए मुळे जयपूरमधील एका विद्यार्थिनीचे भविष्य धोक्यात आले आहे. या मुलीने आपली दहावी पाकिस्तानातून पूर्ण केली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ती जयपूरला आली. त्यानंतर जोधपूर येथे तिने अकरावीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र बारावीच्या शिक्षणासाठी तिने फॉर्म भरला असता ती परीक्षेला बसू शकत नसल्याचे तिला सांगण्यात आले.

सिंध प्रांतातील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीने सिंध मध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचार वाढत गेल्याने भारतात शरण घेतली होती आणि जोधपूरयेथे येऊन दीर्घ काळासाठीच्या विजा साठी अर्ज केला. त्यानंतर मुलीला जोधपूरमधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतून विज्ञान शाखेला अकरावीला प्रवेश मिळाला पुढील शिक्षणासाठी तिने फॉर्म भरला मात्र काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाने तिच्याकडे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचे सांगत तिला परीक्षा नाकारली. दामी असे प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

दामीच्या वडीलांनी सांगितले की, ट्रान्सफर सर्टिफिकीट घेताच तेथील लोकांना संशय येतो, की इथून पळण्याच्या इराद्यात आहे. मग अत्याचार वाढू लागतात. यामुळे हे प्रमाणपत्र आणू शकलो नाही.राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांना देखील याबाबत भाष्य करावे लागले त्यांनी एका मुलाखतीत आणि ट्विटरद्वारे सांगितले की, बोर्डाच्या नियमांनुसार दामीला परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. या संबंधी बोर्डाने पाकिस्तानच्य दुतावासाला पत्रही पाठविले होते मात्र कोणतेही उत्तर आले नाही. राजस्थान सरकारने हा विषय गंभीरतेने घेतलेला असून तिच्या भविष्यासाठी 12 वीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी सीएए बाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रकारच्या शंका असल्यामुळे देशभरात अनेक लोक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले होते. सत्ताधारी भाजपने देखील हे सगळे विरोधक करत असल्याचे सांगत सीएएच्या समर्थनार्थ मोर्चे काढायला सुरुवात केली होती.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/