Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका कार्यक्रमात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) कोरियोग्राफर टेरेंस लुईस (Terence Lewis) याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची चर्चा होती. हा वाद तीन वर्षापूर्वी खुप गाजला होता. मात्र, यावर दोघांनीही शेवटपर्यंत बोलणे टाळले होते. आता इतक्या काळानंतर टेरेंसने (Terence Lewis) याबाबत खुलासा केला आहे. दरम्यान, टेरेन्स आणि नोराच्या नात्याबद्दलही यापूर्वी अनेक प्रकारची चर्चा होती.

 

मनिष पॉलच्या (Manish Paul) ‘पॉडकास्ट’ (podcast) कार्यक्रमात टेरेंसने या प्रकरणाबाबत खुलासा करताना म्हटले की, शोमध्ये अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या. आपण त्यांचे स्वागत चांगल्या पद्धतीने केले पाहिजे असे गीता कपूरला (Geeta Kapoor) वाटले. या भागादरम्यान शोची परीक्षक मलायका अरोराला (Malaika Arora) कोरोनाची लागण झाली होती. म्हणूनच मलायकाच्या जागी नोरा फतेही हा शो जज करत होती.

 

 

टेरेन्स (Terence Lewis) म्हणाला, गीताने सांगितल्याप्रमाणे आम्ही शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. पण यादरम्यान नोराला माझा स्पर्श झाला असल्याचे मला आठवतही नाही. मी का कोणाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आजूबाजूला कॅमेरा असताना मी असे का करेन? या प्रकरणानंतर मला मॅसेजद्वारे शिवीगाळ करण्यात आली. मी नोराबरोबर शो मध्ये डान्सही केला होता.

 

टेरेन्सने सांगितले की, डान्स करत असताना आपण एका वेगळ्याच दुनियेमध्ये असतो. त्यावेळी तुम्हाला दुसरे काही सुचतही नाही.
अशाप्रकारचे कृत्य करायला हिंमत लागते. नोराबरोबर टेरेंसचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या व्हिडीओमध्ये एडिटींग करण्यात आल्याचेही त्याने म्हटले होते.

 

Web Title :- Terence Lewis | controversy about video claiming that touching nora fatehi inappropriately choreographer terence lewis explain his side

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही, मनसेचा खोचक टोला

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड