‘टर्म प्लॅन’बद्दल कुटुंबाला सांगा सर्वकाही, आपण नसल्यास असणार याचाच आधार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टर्म प्लॅन (Term insurance) प्रत्येकाने घ्यायला हवा. तुम्ही जितक्या कमी वयात टर्म प्लॅन घ्याल तितका प्रीमियम कमी लागेल. खरं तर सुशिक्षित लोकसुद्धा आपल्या देशात मुदत विमा घेण्यास संकोच करतात, यामागील कारण म्हणजे यातून कोणतेही रिटर्न मिळत नाहीत. परंतु इथेच ते गडबड करतात, कारण टर्म प्लॅनकडे कधीही गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून पाहू नये.

वास्तविक, टर्म प्लॅन हे सुनिश्चित करतो की आपण हयात नसल्यास आपल्या कुटुंबाला अन्न, वस्त्र, निवारा इत्यादींची कमतरता भासू नये. म्हणजेच, विमाधारकाच्या मृत्यूनंतर, टर्म योजना आर्थिकदृष्ट्या कुटुंबासाठी सर्वात मोठा आधार बनते. आता विचार करा, ज्या कुटुंबासाठी तुम्ही रात्रंदिवस काम करता त्या कुटुंबाच्या गरजा आपण नसताना कशा पूर्ण होतील? म्हणूनच प्रत्येकाने कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी टर्म प्लॅन घेणे आवश्यक आहे.

आपण टर्म प्लॅन दोन मार्गांनी खरेदी करू शकतात. आपण ऑनलाईन घरी बसून टर्म प्लॅन खरेदी करू शकता. देशातील सर्व विमा कंपन्या मुदत विमा प्रदान करतात. याशिवाय एजंटच्या मदतीने देखील तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता. परंतु ऑनलाईन टर्म प्लॅन खूप स्वस्त असतो. आपले वय अंदाजे 30 वर्षे असल्यास आपण 8,000 ते 10,000 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर एक कोटी पर्यंत कव्हर मिळवाल.

आपण ज्यांच्यासाठी टर्म प्लॅन घेतात, त्यांना या विमाबद्दल जरूर सांगा. आपण मुदत विमा ऑनलाईन किंवा ऑफलाइन खरेदी करता तेव्हा कंपनी बॉन्ड पेपर पोस्टद्वारे पाठवते, जे एक महत्त्वाचे कागदपत्र असते. म्हणून ते सुरक्षित ठेवा आणि कुटुंबातील महत्त्वपूर्ण सदस्याला या कागदपत्राबद्दल जरूर सांगा, तसेच त्यांना सांगा की आपण किती (sum assured) रुपयांचा टर्म प्लॅन घेतला आहे.

वास्तविक, आजच्या तारखेस लोक सर्व विमा कंपन्यांचे प्रीमियम ऑनलाईन भरतात, त्यानंतर कंपनी ऑनलाईन मेलवरच पावती पाठवते. जे विमाधारकाला माहित असते. परंतु जर एखाद्या कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला क्लेमची कागदपत्रे गोळा करण्यात प्रारंभिक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच, देयकाच्या पावतीच्या एक किंवा दोन प्रती प्रिंट करून घरात ठेवाव्यात, म्हणजे विमाधारक नसल्यास कुटुंबीय त्या कागदपत्रांच्या मदतीने विम्याच्या रकमेसाठी क्लेम करू शकतील.

महत्त्वाचे म्हणजे मुदत विमा धारकाच्या मृत्यूच्या वेळी नॉमिनीला कव्हरेजची रक्कम मिळते. तुम्ही जितक्या लहान वयात मुदत विमा घ्याल तितका प्रीमियम कमी लागतो. म्हणजेच वयाबरोबर प्रीमियमही वाढतो. एकदा आपण मुदत विमा योजना खरेदी केल्यास, पॉलिसी संपेपर्यंत प्रीमियममध्ये कोणताही बदल होत नाही. पॉलिसी घेताना कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशोकडे जरूर लक्ष द्यावे. टर्म प्लॅनला पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कौटुंबिक उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जाते. ही पॉलिसी किमान वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत घेतली पाहिजे आणि त्याहूनही पुढे घेत असाल तर चांगलेच आहे. काही कंपन्या 80 ते 90 वर्षांसाठी पॉलिसी देतात.