निलंबित हवालदाराने UP पोलिसांना दिली खुलेआम धमकी, ‘ तीन दिवसात करणार 3 मर्डर, दम असेल तर पकडून दाखवा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज पोलिस ठाण्यातील निलंबित हवालदाराने तीन दिवसांत तीन खून करण्याची खुलेआम धमकी दिली आणि तसेच गोरखपूर पोलीसांसह उत्तर प्रदेश पोलिसांना देखील आव्हान दिले की, दम असेल तर मला पकडून दाखवा. या हवालदाराने यूपी पोलिसांसाठी आक्षेपार्ह शब्द देखील वापरले आहेत. एवढेच नव्हे तर तो स्वत: ला हवालदार देखील म्हणत आहेत पण त्याला यूपीच्या डीजीपीचे नावदेखील माहित नाही. सध्या बस्ती, गोरखपूरच्या पोलीसांसह कुशीनगरचे पोलिसही हवालदार च्या शोधात गुंतले आहेत.

निलंबित हवालदार दिग्विजय रायने सोशल मीडियावर धमकी देत म्हंटले की, मी गोरखपूर पोलिस, गोरखपूर एसपी आणि उत्तर प्रदेश पोलिसांना आव्हान देत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दहाच्या आधी मी मोहद्दीपूर चौकाच्या आसपास एका माणसाला ठार मारणार आहे, जर गोरखपूर पोलिसांमध्ये पॉवर असेल, यूपी पोलिसांमध्ये पॉवर असेल तर ते थांबवून दाखवा. परवा देखील खून करणार आहे. सलग तीन खून करणार आहे. जर गोरखपूर पोलिस किंवा यूपी पोलिसांना हा विनोद वाटत असेल तर माझ्याबद्दल गोरखपूरचे एसपी हेमराज मीणा, खलिलाबादचे एसपी आणि कुशीनगरचे एसपी यांच्याशी संपर्क साधा. जर थोडीशी लाज वाटत असेल तर मला पकडा आणि मला खून करण्यापासून थांबवा. हत्येनंतर हत्येचे कारण मी समजावून सांगेन. उद्या माझी 10 वाजता बस्ती टोल प्लाझापासून रॅली आहे.

व्हिडिओमध्ये त्याचा पत्ता आणि ठिकाण देखील सांगत आहे. मी बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंजचा शिपाई असल्याचे सांगून, मी कुशीनगरमधील तारायसुजन पोलिस स्टेशन परिसरातील बासाडिला गुणगर गावचा रहिवासी आहे, माझे वडील जितेंद्र राय असल्याचे तो शिपाई म्हणत आहे.

गुन्हा दाखल करत घेतला जातोय शोध
बरखास्त झालेल्या दिग्विजय रायचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोरखपूरच्या कॅन्ट पोलिसांनी त्याला धमकी दिल्याबद्दल आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. सायबर सेल आणि पाळत ठेवणारी टीमही हवालदाराची माहिती गोळा करीत आहे. बस्ती पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वीही पोलिस लाइनमध्ये घातला होता गोंधळ

मूळचा कुशीनगर येथील हवालदार दिग्विजय रायने यापूर्वीही पोलिस लाइनमध्ये गोंधळ घातला होता. तो बस्तीच्या कप्तीगंज पोलिस ठाण्यात तैनात होता. माहितीनुसार, गेल्या वर्षी 3 आणि 4 डिसेंबर रोजी त्याच्यावर पोलिस लाइनमध्ये असभ्य वर्तन केल्याचा आरोप होता. सैनिक अधिकाऱ्यांविषयी अशोभनीय गोष्टी बोलला. 10 डिसेंबर रोजी त्याने पोलिस लाईनमध्ये गोंधळ घातला. खुर्च्या तोडल्या. त्याने फेसबुकवर एक लाइव्ह अशोभनीय पोस्ट केली. यानंतर एसपी हेमराज मीणा यांनी त्यांना निलंबित केले. त्यानंतर त्याने एसपीला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कप्तानगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.