Mumbai-Ahmedabad Expressway : भरधाव गाडीचा टायर फुटला, अपघातात दोघे जागीच ठार, 6 जखमी

कासा : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव इको गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले आहेत. मृतात 1 वर्षाचा लहान मुलाचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरी जवळील सूसरी नदीच्या पुलावर शनिवारी (दि. 23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात इको गाडीचा चक्काचूर झाला आहे.

नाझनीन शेख (वय 46, रा. माहिम, मुंबई) मुझेन शेख (1 वर्ष ) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर शाईन नाईक (46 वर्षे ), आशिक अली (65 वर्षे), टूबा शेख (6 वर्षे) , आतीफा शेख (9 वर्षे), जनाफ शेख (7 वर्षे), जोया शेख (6 वर्षे) आणि ड्रायव्हर अयान नाईक (29 वर्षे ) अशी जखमीची नावे असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपचार चालू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माहिम, मुंबई येथील शेख कुटुंबिय नातेवाईकाच्या लग्नासाठी इको गाडीने वापी (गुजरात) येथे जात होते. या गाडीत एकूण लहान मुलासह 10 जण होते. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान नेमके त्याचवेळी या महामार्गावरून प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश माळी व जिल्हा उपाध्यक्ष निलेश कासट हे जात होते. त्यांनी तेथे थांबून मदतकार्य केले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.