नगर-औरंगाबाद महामार्गावर लक्झरी बस -कार यांच्या भीषण अपघातात 5 जण ठार

औरंगाबाद : नगर -औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ कार आणि लक्झरी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले. ही दुदैवी घटना सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

अहमदनगरहून औरंगाबादकडे लक्झरी बस जात होती. त्याचवेळी औरंगाबादकडून नगरच्या दिशेने स्विफ्ट कार येत होती. देवगड फाट्याजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटले व त्याने समोरुन आलेल्या बसला सरळ समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात कारचा चक्काचुर झाला. अपघाताचे वृत्त समजताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमध्ये अडकून पडलेल्या सर्वांना बाहेर काढले व जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. हे सर्व जण जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.