लासलगाव-विंचूर रोडवर भीषण अपघात; दोघे जागीच ठार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव विंचूर रस्त्यावर शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी सातच्या सुमारास मालट्रक व मोटरसायकच्या भीषण अपघात होऊन या अपघातात विवेक कारभारी दरेकर वय २८ वर्ष, शेखर रमेश गुंजाळ वय २६ वर्ष हे दोन जण ठार तर चार गंभीर जखमी झाले. अपघातात ठार झालेले दोनही युवक विंचूर जवळील हनुमाननगर येथील होते. अपघात झाल्याची माहिती समजताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने निफाड येथे रूग्णालयात पाठविण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, लासलगाव येथून विंचूरकडे जात असताना लासलगाव – विंचुर रोडवर मंजुळा लॉन्स जवळ मालट्रक नंबर MH 15 BJ 6156 वाहन चालकाचा ताबा सुटल्याने या झालेल्या भीषण धडकेत विवेक कारभारी दरेकर वय २८ वर्ष, शेखर रमेश गुंजाळ वय २६ वर्ष दोन्ही रा. हनुमाननगर ठार झाले आहे. तर सदरचा ट्रक रस्त्याच्या बाजुच्या शेतात राहणारे शेतमजुर यांच्या राहत्या घरात घुसली यावेळी घराबाहेर उभी असलेली जर्शी गाईचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात आरती दिपक चव्हान वय 18 वर्ष, आकाश राजु मोरे वय 14, निकीता ज्ञानेश्वर चव्हाण वय 13 वर्ष, नितीन संदीप चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून घरातील संसार उपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक ने दिलेल्या घडकेत मोटरसायकलचा चक्काचुर झाला आहे.

या प्रकरणी आकाश संतोष गुंजाळ रा. हनुमाननगर यांनी मारुती रंगनाथ सुरासे रा. देवठाण ता. येवला जि. नाशिक याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.