PM मोदी, NSA डोवल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, दिल्‍लीत रेड अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया करण्यासाठी दिल्लीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे. एका वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे दहशतवाद्यांचेय मुख्य टार्गेट आहेत. त्यांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्पेशल स्क्वॉडही तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी रेड अलर्ट जारी करत दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे.

बुधवारी रात्री पासून दिल्लीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून स्पेशल सेल पोलिसांनी 9 ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान, आम्ही सतर्क आहोत. दहशतवादविरोधी सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत. मिळालेल्या इनपूटवर आम्ही काम करत असल्याचे सेंट्रल दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

राजधानीमध्ये घुसलेल्या चार दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवल यांच्यासह दिल्लीतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करण्याची शक्याता आहे. त्यापैकी चार अतिमहत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घुसलेल्या अतिरेक्यांपैकी दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे हे अतिरेकी आठवडाभरापूर्वीच दिल्लीत घुसले आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आल्यामुळे त्याला विरोध म्हणून दिल्लीत मोठा घातपात घडविण्याचा या अतिरेक्यांचा डाव असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

isit : Policenama.com