‘आयपीएल’वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भारतात लोकांवर दोनच गोष्टींचा ज्वर चढला आहे. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरे म्हणजे आयपीएल. लोकसभेच्या मतदानाला सुरुवात तर झाली. मात्र आयपीएलला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आयपीएल सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात मुंबईतील वानखेडे स्टेडिअमही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येऊ शकतं. सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येईल.

यंदा आयपीएलला नेहमीपेक्षा लोकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक या सामन्यांना हजेरी लावर आहेत. या आंनदाच्या वातावरणात दहशतवादी हल्ल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भितीचेही वातावरण आहे. मात्र दहशत वादावर मात करण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सजक झाल्या आहेत.

दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार आयपीएलमधे खेळत असलेल्या खेळाडूंच्या बसला लक्ष्य केले जाऊ शकते. तसंच खेळाडू जिथे निवास करतात, त्या हॉटेल्सना ही टार्टेग केले जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी आपला पहारा वाढवला आहे. त्यासोबत मुंबई पोलिसांनीही सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. स्टेडिअम, खेळाडूंची बस, हॉटेल या सर्व यंत्रणेकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

You might also like