उरी पेक्षा मोठा हल्ला, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दोन वर्षापासून भारत दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित असल्याचे समजत होता. मात्र आज दहशवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामामध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये CRPF चे ४२ जवान शहीद झाले आहेत. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीमध्ये राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये १८ जवान शहीद झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेणार असे सांगितले होते. आज झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदींनी बदला घेणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. यानंतर सेने ने याला प्रतीउत्तर देताना पाकिस्तानच्या अधिकृत काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर २९ सप्टेंबर २०१६ला सर्जिकल स्ट्रइक केला होता. आजच्या हल्ल्यानंतर मोदी सरकारवर पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी कॅम्पवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याचा दबाव टाकला जाऊ शकतो.

या हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शहीत जवानांच्या कुटुंबासोबत संपूर्ण देश खांद्याला खांदा लावून उभा राहील. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या अगोदर मोदी सरकारवर कारवाई करण्याच दबाव टाकला जाऊ शकतो.

आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, ४२ जवान शहीद
शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी