टेरर फंडिंग : 3 आरोपींना ATS कडून अटक, कोठडी

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश पोलिसांच्या एटीएसने गुरुवारी सतना येथून दहशतवाद्यांना पैसे पाठविण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या तीन जणांना आज कोर्टात हजर केले. कोर्टाने तिघांना पुढील चौकशीसाठी पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक(ATS) भोपाळचे पोलिस अधीक्षक प्रणव नागवंशी यांनी सांगितले की, सतना येथून अटक करण्यात आलेल्या सुनील सिंग, बलरामसिंग आणि शुभम मिश्रा यांना शुक्रवारी पोलिस कोठडीत हजर करण्यात आल असता पुढील चौकशीसाठी आरोपीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणातील पुढील तपासासाठी एटीएसकडे सुपूर्द केले असून पुढील चौकशीला वेग आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी गुरुवारी दहशतवाद्यांकडे पैसे हस्तांतरित केल्याच्या आरोपाखाली सतना येथून तीन जणांना अटक केली आणि दोन इतरांना ताब्यात घेतले. या आरोपींनी पाकिस्तानमधील विविध फोन नंबरवर संपर्क साधला होता आणि दहशतवाद्यांशी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला. हे आरोपी ISI साठी काम करत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

अटक केलेल्या आरोपींविरूद्ध एटीएसने भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम १२३ अन्वये (युद्धाची सोय करण्याचा इरादा लपवून ठेवत) गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात विचारले असता जिल्हा पोलिस अधीक्षक रियाझ इकबाल यांनी गुरुवारी पीटीआयला सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी सुनील सिंह, बलरामसिंग आणि शुभम मिश्रा यांना अटक केली आहे. तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या पाच जणांना या प्रकरणातील पुढील चौकशीसाठी दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आले आहे.

ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्ती बलारामलाही हेरगिरी आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठा प्रकरणी फेब्रुवारी २०१७ मध्ये देखील एटीएसने अटक केली होती. त्यानंतर बलाराम जामिनावर बाहेर होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like