मोठी बातमी : मुंबई, दिल्ली, गोव्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई, गोवा पोलिसांना अटर्ल जारी केला आहे.

न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने इस्लामिक स्टेट आणि अल – कायदा या दोन संघटना ज्यू धर्मियांच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. येत्या चार दिवसांत हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दहशतवाद्याकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

या संभाव्य हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबु हसन अल-मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत.

ही माहिती मिळाल्यानंतर इस्रायली दूतावास, मुंबईतील दूतावास तसेच यहुदी लोकांची धर्मस्थळे, सिनेगॉग्स आणि छाबड हाऊस अशा ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like