Pune News : येरवड्यात टोळक्याचा धुडगूस, वाहनांची तोडफोड, दोघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टोळक्यांने धुडगुस घालत 7 ते 8 वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. तसेच दगडफेकीत दोन तरुण जखमी झाले आहेत. येरवडयातील फुलेनगरमधील महात्मा फुले उद्यानाजवळ रविवारी (दि. 28) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

येरवड्यातील महात्मा फुले उद्यान तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची टोळक्याने लोखंडी रॉ़ड आणि दगडाच्या साह्याने तोडफोड केली. या परिसरात दारू गांजा पिण्यासाठी बाहेरून मुले मोठ्या प्रमाणावर येतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची मोडतोड करीत दोन तरुण गंभीर जखमी केले आहे. जखमींना उपचारासाठी येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.