पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

श्रीनगर : Terrorist attack in Pulwama | दहशतवाद्यांनी हरिपरिगाम अवंतीपोराचे विशेष पोलीस अधिकारी फैयाज अहमद यांच्या घरात शिरुन त्यांच्यावर अंधाधुुंध गोळीबार केला. त्यात फैयाज आणि त्यांची पत्नी दोघांचा मृत्यु झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील हरपिरिगाम त्राल परिसरात ही घटना घडली.  दहशतवाद्यांनी (Terrorist) रविवारी रात्री फैयाज अहमद यांच्या घरात शिरुन ४१ वर्षीय फैयाज अहमद, त्यांची पत्नी राजा बेगम आणि मुलगी रफिया यांच्यावर गोळीबार केला. त्यात फैयाज यांचा जागीच मृत्यु झाला.

गंभीर जखमी झालेल्या पत्नी व मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु होताच
पत्नीचा मृत्यु झाला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मुलीचा ही उपचार सुरु असताना मृत्यु
झाला आहे.

फैयाज अहमद यांना दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती.
मात्र, त्यांनी तसे न केल्यामुळे आता त्यांच्यावर हा हल्ला करुन संपूर्ण कुटुंबाला संपविण्यात आल्याचे
दिसून येत आहे. जम्मू विमानतळावर (Jammu Airport) ड्रोनच्या सहाय्याने स्फोटकांचा हल्ला
केला होता. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.

हे देखील वाचा

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Terrorist attack in Pulwama | Terrorists shot dead a former special police officer (SPO) of Jammu and Kashmir Police in his home at Hariparigam village in Pulwama district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update