अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 70 पोलिसांचा मृत्यू

गजनी (अफगाणिस्तान) : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली असून, यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. गजनी शहरावर तालिबानने केलेल्या हल्ल्यात मागील चार दिवसांमध्ये 70 पोलिसांसह 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चार दिवसांपासून गजनी शहरात संघर्ष सुरू आहे तालिबान दहशतवाद्यांनी आज पुन्हा हल्ला करुन गजनी शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलातील 70 पोलिसांना आपला जीन गमवावा लागला असल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारकडून देण्यात आली आहे.

तणावाची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त 1 हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सद्यातरी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे आणखी जिवितहानी होणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे गजनी शहरातील टेलिफोन आणि विद्युत सेवा ठप्प झाली असून, अन्न आणि पाणी देखील लोकांना मिळणे कठीण झाले आहे.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65bbcc65-9f01-11e8-a04d-2b2d2045bb87′]
सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे येथील परिस्थिती तणावाची बनत चालली असून, अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसापासून तालिबाण्यांकडून अफगाणिस्तानमध्ये हल्ले करण्यात येत आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानमधील काही भागावर कब्जा हवा असल्यामुळे तालिबाण्यांना पाक लष्कराची साथ असल्याचेही बोलले जात आहे.