दहशतवाद्यांचा विमान अपहरणाचा प्रयत्न

ढाका : वृत्तसंस्था – बांगलादेशमधून दुबईला जाणारे विमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान दहशतवाद्यांनी हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरणाचा प्रयत्न झालेले विमान हे स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५. १५ वाजता चितगांव एअरपोर्टवर उतरले होते. या विमानात बांगलादेशच्या खासदारांसह इतर प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी ढाक्याहून दुबईला जाणारे विमान चत्तोग्राम येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपहरणाचा प्रयत्न झाला.बांगलादेश मधून दुबईला जाणारे विमान बांगलादेश एअरलाईन्सचे विमान ढाकाहून दुबईला जात असतानाच अचानक एका प्रवाशाने त्याच्याकडील बंदूक घेत पायलटच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्याने पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी बोलण्याची मागणी केली. या विमानाचे चित्तागाँगच्या आतंरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. पोलीस व जलद कृती दलाचे सैनिक विमानतळावर पोहोचले असून विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र दहशतवादी अद्याप विमानातच असून त्यांनी एका क्रु मेंबरची हत्या केल्याचे समजते.

दरम्यान काल एअर इंडीयाच्या कॉलसेंटरमध्ये फोन करून तुमचे विमान हायजॅक करून ते पाकिस्तानात नेऊ अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमातळांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.