दहशतवादी हाफीज सईदवर युएनकडून बंदी कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई 26-11 हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार असणारा आणि कुख्यात दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा म्होरक्या हाफीज सईद याने बंदी घालण्यात आलेल्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव वगळण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागणी केली होती ही मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावली आहे.

भारताने हाफीज सईदचा पर्दाफाश करणारी अत्यंत गोपनीय माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेला सादर केली होती. त्यामुळे जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून हाफीज सईद याचं नाव वगळण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळली असल्याचे हाफीजच्या वकिलाला संयुक्त राष्ट्रसंघाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या १२६७ स्वीकृती समितीकडे जैश- ए-मोहम्मद म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या नावाचा याच यादीमध्ये समावेश करण्यासाठी नवीन विनंती आली आहे. पुलवामा दहशतवादी आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती.

मुंबईमध्ये 2008 साली भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर हाफीजसह त्याच्या संघटनेवर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातली होती. याच बंदीविरोधात हाफीज सईद याने संयुक्त राष्ट्रात एक याचिका दाखल केली होती. लाहोरस्थित एका फर्मकडून हाफीजने ही याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे. मुख्य म्हणजे हाफीज सईद पाकिस्तानात अजूनही नजरकैदेत आहे.

ह्या हि बातम्या वाचा

मार्चअखेर कर्ज होणार स्वस्त

दफनभूमीच्या मागणीसाठी मृतदेहच आणला महापालिकेत

Rafale Deal : ‘राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका !’

जम्मूत ग्रेनेड हल्ला करणाऱ्याला अटक  पोलिस महासंचालकांची माहिती

खराब मालाची विक्री केल्याने दुकानदारावर सपासप वार