जम्मू-कश्मीर : नायकूनंतर ताहिर आणि आज मारला गेला जुनैद, हुर्रियत चेअरमनचा मुलगा होता हा दहशतवादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीनगरमधील कानेमजार नवाकदल भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत जुनैद सहराई आणि पुलवामा रहिवासी तारिक अहमद शेख मारले गेले. जुनैद सहराई (वय 29) सय्यद अली शाह गिलानी याच्या नंतर तेहरीक-ए-हुर्रियतचा अध्यक्ष मोहम्मद अशरफ सहराई याचा मुलगा होता. मार्च 2018 मध्ये जुनैद नमाज अदा केल्यानंतर बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

जुनैद काश्मीर विद्यापीठातून एमबीए पूर्ण केल्यानंतर मार्च 2018 मध्ये हिजबुलमध्ये दाखल झाला. तो बर्‍याच दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच वेळी, या चकमकीसंदर्भात जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, पोलिसांच्या विश्वसनीय स्त्रोतांकडून माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री श्रीनगरमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा सामना केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारास सैनिकांनीही चोख प्रतिउत्तर दिले. थोड्या वेळाने गोळीबार थांबला. सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. कित्येक तास चाललेल्या या चकमकीत जुनैद सहराईसह दोन दहशतवादी ठार झाले आहेत. रियाज नायकू नंतर ताहिर मोहम्मद भट आणि आता दहशतवादी जुनैदच्या हत्येने हिज्बुलला मोठा धक्का बसला आहे. यासह, हिजबुल आता सफाईच्या मार्गावर आहे.

सुरक्षा दलांनी ही कारवाई अत्यंत सावधगिरीने केली. कारण ज्या ठिकाणी चकमक झाली, तो भाग दाट लोकवस्तीचा रहिवासी क्षेत्र होता. चकमकीच्या ठिकाणी असलेले सर्व मार्ग पूर्णपणे बंद होते. एवढेच नव्हे, चकमकीबद्दल कोणतीही अफवा पसरू नये यासाठी प्रशासनाने श्रीनगरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली. जवळपास दोन वर्षांनंतर श्रीनगरमध्ये हा सामना झाला.