जम्मू काश्मीरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; PSO सह दोघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  जम्मू काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवाद्यांनी नगरसेवकांच्या बैठकीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका पीएसओसह दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसरावर ताबा मिळविला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.

या दहशतवादी हल्ल्यात बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान जखमी झाल्या असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हल्ल्यानंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. हल्ल्यात किती दहशतवादी होते, कोणत्या संघटनेने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. मात्र ते याच भागात लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षादलांनी संपूर्ण परिसर सील केला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.