Terrorists Attack | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर व त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांकडून हल्ला; अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

मणिपूर : वृत्तसंस्था –  Terrorists Attack | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorists Attack) केला आहे. शनिवारी (दि.13) सकाळी 10 वाजता शेख-बेहियांग पोलीस ठाण्याच्या (Sheikh-Behiang Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात (Terrorists Attack) 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर (Commanding Officer) आपल्या कुटुंबासह क्यूआरटी (QRT) जात होते. तेंव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, क्यूआरटीमध्ये तैनात कमांडिंग ऑफिसर आणि 7 सैनिकांची पत्नी आणि एका मुलाचाही मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सध्या यासंदर्भात लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

मणिपूरचे मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग (CM Nongthombam Biren Singh) यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि असे भ्याड कृत्य सहन करणार नाही असे सांगितले. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. हे अमानुष आणि दहशतवादी कृत्य असल्याचं ते म्हणाले.

 

Web Title : Terrorists Attack | Terrorist attack on commanding officer of Assam Rifles and his family in Manipur; 7 jawans martyred along with officer’s wife and child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tulsi Vivah 2021 | तुळशी विवाहात करा ‘या’ मंत्राचे आणि मंगलाष्टकांचे पठन, मिळेल ‘सुख-सौभाग्य’

Reducing Fat Under Chin-Throat | गळ्यासह हनुवटीच्या खालील चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक आहेत या 6 एक्सरसाइज

India vs Pakistan | टी-20 नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात ‘आमने-सामने’