हिंदू नेत्यांची हत्या करण्याचं देण्यात आलं होतं ‘टार्गेट’, दरवाजावर असलेल्या पोस्टरवरून मिळवायची होती ‘माहिती’, अटकेतील ISIS आतंकवाद्यांचा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन दिवसांआधी दिल्लीत पकडण्यात आलेल्या तीन संशयित अतिरेक्यांनी मोठा खुलासा केला आहे. चौकशी दरम्यान जफर नावाच्या एका दहशतवाद्याने इंटेलिजन्स एजन्सी (Intelligence Agency) ला सांगितले की तो येथे शहीद होण्यासाठी येथे आला आहे. त्याला येथील मोठ्या आणि प्रसिद्ध अशा हिंदू नेत्यांना ठार मारण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. मोठ्या नेत्यांविषयी माहिती त्याला शहरांत लावलेल्या पोस्टर्स वरून घ्यायची होती. त्यांनतर पूर्ण प्लांनिंग नुसार संबंधित नेत्यावर हल्ला केला जाणार होता. सैन्य आणि पोलिसांच्या भरती शिबिरासाठी रेकी करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती असे त्याने सांगितले. तसेच त्यांच्या हैंडलरने त्यांना सांगितले होते की वर्दीत असणारा एखादा मोठा अधिकारी दिसला तर त्याला ठार मारा.

गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या तिन्ही दहशतवाद्यांची योजना देशातील मोठमोठ्या शहरात हमला घडवून आणण्याची होती. त्याचबरोबर आरएसएस चे काही मोठे नेते देखील त्यांच्या निशाण्यावर होती. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पकडण्यात आलेल्या ISIS दहशतवाद्यांची उत्तर प्रदेशमध्ये मोठा हमला करण्याची योजना होती. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश एटीएस आता दिल्ली एटीएसच्या संपर्कात आहे. चौकशी दरम्यान असेही समोर आले आहे की या तिन्ही दहशतवाद्यांनी आपापसात संवाद साधण्यासाठी अशा अ‍ॅपचा वापर केला होता की कम्युनिकेशन संपताच मजकूर आपोआप डिलीट व्हायचा.

९ जानेवारीला तिन्ही दहशतवादी पकडले गेले
९ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चकमकीनंतर ISIS च्या तीन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर पोलिस अधिकारी पी. एस. कुशवाहा यांनी सांगितले होते की अटक केलेले तीन आरोपी तामिळनाडू येथून फरार होते. त्यांचे अजून तीन साथीदार होते आणि ते नेपाळमध्ये पळून गेलेत. या तिघांवर आरोप आहे की ते दिल्ली आणि वेस्टर्न उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करणार होते. ही दहशतवादी संघटना आयएसआयएस मॉड्यूलने प्रभावित होते. याशिवाय एका नेत्याच्या हत्येमध्येही त्यांचा हात होता.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/