जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भरती बंद झाली : राज्यपाल सत्यपाल मलिक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू-कश्मीरमध्ये शांतता असून तेथे पर्यटकांसह नागरिकांना कोणताही धोका नाही. आता काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनाही बंद झाल्या आहेत. दहशतवाद्यांची भरतीही बंद झाली, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

आज मलिक यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांची लढाई आता सरकारसोबत आहे. पर्यटकांशी नाही. दहशतीच्या माध्यमातून काहीही मिळणार नसल्याची बाब दहशतवाद्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे चर्चेतूनच प्रश्न सोडवावे लागतील, असे दहशतवाद्यांच्या लक्षात आले आहे.

जम्मू-कश्मीर बँक अतिशय चांगले काम करत आहे. मध्यंतरी काही गडबड आढळून आली होती. त्यात बँकेचा कोणताही दोष नव्हता. भारतात कोणतीही व्यवस्था निर्माण करा, राजकारणी काहीना काही ‘घफला’ करतात. मात्र ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. ज्या लोकांनी घोळ घातला, त्यांना चिंता करण्याची गरज असल्याचेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले.

सिने जगत

अभिनेत्री कतरिना कैफला व्हायचंय ‘भाईजान’ सारखं ‘चुलबुल पांडे’

‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’