धक्‍कादायक ! जम्मू काश्मीरमध्ये ‘हॅन्ड ग्रेनेड’ जवानांवर टाकण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट’, निशाणा ‘सही’ तर मिळतात रु.५००

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी १९८०-८९ च्या काळात ‘हॅन्ड ग्रेनेड’ फेकण्यासाठी तरुणांना ‘कॉन्ट्रॅक्ट’ देण्याची पद्धत सुरु केली होती. तसाच प्रकार पुन्हा सुरु झालेला असून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी संघटनांकडून जम्मू काश्मीर मधील युवक आणि अल्पवयीन मुलांची माथी भडकवून आणि त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून ठेकेदारी तत्वावर ‘हॅन्ड ग्रेनेड’ फेकण्याचे काम करून घेतले जात आहे.

ऐंशीच्या दशकात भारतीय सुरक्षा दलांवर ‘हॅन्ड ग्रेनेड’ फेकण्याच्या या कामासाठी बेरोजगार तरुणांना ५० रुपये मिळत होते तर आता मात्र ५०० रुपये मिळतात.विशेष म्हणजे बॉम्ब ठरलेल्या निशाण्यावर लागला तरच हे पैसे दिले जातात. ‘हॅन्ड ग्रेनेड’चा वापर होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे यामध्ये पुरावे सापडत नाहीत आणि नुकसानही फार मोठ्या प्रमाणावर घडवून आणता येते.

बुधवारी सीआरपीएफ जवानांवर झाला होता हल्ला :

बुधवारी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहिद झाले होते तर अनेक जखमी आहेत. या हल्ल्यामध्ये देखील या प्रकारे हॅन्ड ग्रेनेड चा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला होता. अल मुजाहिदीन या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे.

अशा प्रकारे युवक आणि अल्पवयीन मुलांना ‘हॅन्ड ग्रेनेड’ फेकण्यासाठी आपल्या जाळ्यात अडकवतात दहशतवादी :

सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार दहशतवादी या भागातील मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बेरोजगारीचा फायदा उचलतात. येथील परिस्थितीच अशी आहे कि युवक आणि अल्पवयीन मुले पैशांसाठी सहजतेने दहशतवाद्यांबरोबर काम करण्यास तयार होतात.
मागील काही वर्षांपासून भारतीय सुरक्षा दले दहशतवादी कारवाया थांबविण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवत आहेत. त्यामुळे पाकिस्तानात असणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या सूत्रधारांनी ‘हॅन्ड ग्रेनेड’ची ही शक्कल लढवत रणनीतीत बदल केला आहे.’स्लीपर सेल’च्या मदतीने अशा कारवाया घडवून आणल्या जात आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये राहणारे दहशतवादी संघटनांचे ठेकेदार स्थानिक युवकांची माथी भडकावून आणि पैशांचे अमिष दाखवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेत आहेत. ‘हॅन्ड ग्रेनेड’ फेकण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी कसल्याही मोठ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याने २-३ दिवसांत हे तंत्र युवकांना शिकविले जाते. टार्गेटवर जास्तीत जास्त नुकसान कसे होईल तेच यामध्ये शिकवले जाते.
दहशतवाद्यांबरोबरच्या समोरासमोरील लढाईमध्ये फोन, डायरी, कोड नंबर किंवा इतर काही ना काही पुरावे सापडतातच. परंतु गर्दीमध्ये फेकलेल्या ‘हॅन्ड ग्रेनेड’ च्या हल्ल्यांमध्ये पुरावे सापडणे अत्यंत कठीण असल्याने याचा वापर ठेकेदारांकडून प्रभावीपणे केला जातो. काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर दगडे फेकून जे हल्ले केले जातात तेदेखील या ठेकेदारांद्वारेच केले जातात.

सिनेजगत

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’