Tesla Car | भारतात टेस्ला कार लाँचिंगबाबत Elon Musk यांचे मोठे वक्तव्य, जाणून घ्या काय आहे मस्क यांचा प्लान?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी (Car Manufacturing Company) टेस्ला (Tesla) आता भारतीय बाजारात उतरणार आहे. यासाठी टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांच्यासह भारतीयांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे. एलन मस्क भारत सरकारसोबत चर्चा करून लवकरात लवकर Tesla Car कार भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान एका भारतीयाने एलन मस्क यांना ट्विटरवर टॅग करत म्हटले – प्लीज भारतात टेस्ला कार लवकरात लवकर लाँच करा!..‘ यावर सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहणार्‍या मस्क यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. एलन मस्क यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, टेस्ला इंक (Tesla Inc) आयात वाहनांसह यशस्वी होण्यासाठी भारतात एक कारखाना स्थापन करू शकते.

मस्क पुढे काय म्हणाले?

मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले, आम्हाला असे करायचे आहे, परंतु कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत आयात शुल्क जगात सर्वात जास्त आहे. याशिवाय, स्वच्छ ऊर्जा वाहनांना डिझेल किंवा पेट्रोलच्या समान मानले जाते, जे भारतातील लक्ष्यांशी पूर्णपणे सुसंगत वाटत नाही.

 

आयात शुल्क कमी करण्याची मागणी

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, एलन मस्क यांचे लक्ष्य याच वर्षापासून भारतात टेस्लाची विक्री सुरू करायची आहे.
मंत्रालय आणि देशातील प्रमुख थिंक-टॅक नीती आयोगाला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, पूर्णपणे असेंबल करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कारच्या आयातीवरील टॅक्स 40% पर्यंत कमी करावा.
अमेरिकेची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लाने भारत सरकारला इलेक्ट्रिक कारवर इम्पोर्ट टॅक्स कमी करण्याची विनंती केली आहे.
माहितीनुसार टेस्ला इंकने भारतीय मंत्रालयांना पत्र लिहून इलेक्ट्रिक वाहनांवर इम्पोर्ट टॅक्स (Import tax) कमी करण्याची मागणी केली आहे.

Web Title : Tesla Car | please launch tesla cars in india asap know what elon musk replied

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CoWin Portal वर स्वत: दुरूस्त करू शकता तुमचे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट, ‘ही’ आहे अतिशय सोपी पध्दत, जाणून घ्या

India Book of Records | 5 वर्षाच्या चिमूरडीने 5 मिनिटांत म्हंटले संस्कृतचे 30 श्लोक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

Pune Bangalore National Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद, अनेक वाहने अडकली (Video)

Crime in Nagpur | पोलिसांच्या दाव्याची संशयिताने केली पोलखोल; म्हणाला – ‘चार महिन्यापासून बंद आहेत सीसीटीव्ही’