Tesla च्या गाड्यांची भारतात लोक सोशल मीडियावर उडवत आहेत खिल्ली, पाहा सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर काय होऊ शकतात हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रसिद्व इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाची भारतात अतुरतेने वाट पाहिली जात आहे, आणि एलन मस्क टेस्लासाठी भारतात एक रेड-कार्पेट किंवा असे म्हणा की मार्ग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, भारतातील लोकांमध्ये जेवढा उत्साह दिसून येत आहे तेवढीच सोशल मीडियावर खिल्ली सुद्धा उडवली जात आहे. नुकत्याच अशा काही पोस्ट शेयर करण्यात आल्या ज्या पाहून एलन मस्क अस्वस्थ होऊ शकतात. आपण अशाच काही पोस्ट पाहणार असून सोबतच टेस्लाच्या भारतात लाँच होणार्‍या गाड्यांबाबत जाणून घेणार आहोत.

मस्क यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विट केले होते की, कंपनी भारतीय बाजारात पुढील वर्षी लाँचसाठी तयार आहे. याच पार्श्वभूमीवर 2021 मध्ये आता मस्क यांनी यास दुजारो सुद्धा दिला आहे. हे ट्विट टेस्ला क्लब इंडिया नावाच्या एका हँडलद्वारे भारतातील लाँचच्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी केले होते. डिसेंबरमध्ये रस्ते परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाला सांगितले होते की, टेस्ला 2021 च्या सुरूवातीला भारतात संचालन सुरू करेल. भारतात येणारे पहिले मॉडल जास्त किफायतशीर टेस्ला मॉडल 3 असेल. ज्याची किंमत 55.60 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तसेच याची बुकिंग काही आठवड्यात सुरू होऊ शकते.

नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये टेस्लाच्या कारला सेल्फ ड्रायव्हिंग मोडमध्ये परत येताना दाखवले आहे, मात्र, कारची स्थिती खुपच खराब आहे, जिची खिडकी खाली पडली आहे, तर कारचे बंपर पूर्णपणे तुटलेले आहेत, सोबतच एका पोस्टमध्ये टेस्लाची गाडी सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर दाखवली आहे, जिच्या टपावर बसून व्यक्ती प्रवास करत आहे. आता अशाप्रकारच्या पोस्ट खुप शेयर होत आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का, याचे कारण काय आहे?

कारण भारतातील ट्रॅफिकची समस्या तर सर्वांनाच माहित आहे, येथे रस्त्यावर वाहनांना धावण्यासाठी रिकामा रस्ता मिळत नाही, मग सेल्फ ड्रायव्हिंग मोड कसा यशस्वी होणार. आता हे तर काळच सांगेल की, टेस्लाच्या या मोडला भारतातील लोक आणि येथील रस्ते किती समजतात.