सन 2020 मध्ये ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये दिसून आली प्रचंड तेजी, गुंतवणूकदार झाले ‘करोडपती’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मागील वर्ष शेअर बाजारासाठी (Stock market) खूप चढ-उताराचे राहिले. आधी अमेरिका-चीन ट्रेड वॉर आणि त्यानंतर कोरोना विषाणू साथीमुळे जागतिक शेअर बाजारामध्ये (Stock market) प्रचंड घट पहायला मिळाली. यानंतर विविध देशांनी केलेल्या मदत पॅकेजच्या घोषणेमुळे बाजाराने सावध पवित्रा घेतला, वर्षे सरता-सरता तर अनेक शेअर बाजार (Stock market) विक्रमी पातळीवर पोहोचले. शेअर बाजाराच्या (Stock market)  गुंतवणूकदारांसाठी गेल्या वर्षी असे अनेक शेअर्स होते ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल बनवले. यापैकीच एक टेस्लाचा शेअर (tesla stock) आहे.

2020 मध्ये एलन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्सची किंमत लक्षणीय वाढली. मागील वर्षी या शेअर्सच्या किंमती 700 टक्क्यांहून अधिक वाढल्या. यामुळे टेस्ला ही जगातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली.

मागील वर्षी ज्यांनी टेस्लाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली ते मालामाल झाले. हे गुंतवणूकदार नफ्यामुळे इतके खूष आहेत की त्यांनी स्वत:ला मिलेनिअर किंवा बिलेनिअर ऐवजी टेस्लानिअर म्हणण्यास सुरूवात केली आहे. टेस्लाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठा स्टॉक इंडेक्स एस अँड पी-500 मध्ये प्रवेश केला होता. डिसेंबरमध्ये टेस्लाच्या शेअर्सनी मोठ्या प्रमाणात उडी घेतल्यामुळे ती या इंडेक्सच्या टॉप-10 कंपन्यांमध्ये सामील झाली.

टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीबद्दल बघितले तर जून 2010 मध्ये टेस्लाचे शेअर्स केवळ 17 डॉलर प्रति शेअर्सच्या किंमतीवर बाजारात आले होते. त्याच वेळी, कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या आठवड्यात 650 डॉलर पेक्षा जास्त झाली आहे. अशा प्रकारे, कंपनीच्या शेअरची किंमत जनरल मोटर्स, फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्स, फोर्ड आणि टोयोटाच्या एकत्रित किंमतीपेक्षा जास्त झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीला याचे शेअर्स खरेदी केले होते त्यांना खूप फायदा झाला आहे.

टेस्ला शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चीनमधील मागणीतील वाढ. त्याच वेळी, अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की टेस्लाच्या शेअर्सना पारंपारिक मापदंडानुसार जास्त रेटिंग दिले जात आहेत आणि नाटकीयरित्या यामध्ये वाढ होत आहे.