एकमेकांसोबत ओपन रिलेशनशिपमध्ये हॉलीवुडचे ‘हे’ 3 स्टार्स? KISS करतानाचे फोटोज वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सेलिब्रिटींची रिलेशनशिप चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. अलिकडेच डायरेक्टर तायका वतिती आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रीटा ओरा आणि अभिनेत्री टेसा थॉम्पसन यांच्या किस करतानाच्या छायाचित्रांनी लोकांना धक्का बसला. तायका आणि ओराचे रिलेशन काही दिवसापूर्वीच लोकांना समजले होते. आणि आता त्यांच्यासोबत टेसा थॉम्पसनला रोमँटिकली इन्व्हॉल्व पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे.

https://twitter.com/CarineK/status/1396564628038107136?ref_src

तायका, रीटा आणि टेसा, तिघांना रविवारी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका ऑल-नाईट पार्टीनंतर उन्हात रिलॅक्स करताना स्पॉट केले गेल. या दरम्यान तिघेही एकमेकांसोबत मजामस्ती करत होते आणि किस करताना दिसले. त्यांच्या वायरल छायाचित्रांनी खळबळ उडाली आहे.

https://twitter.com/sh_tsorry/status/1396608738358870023?ref_src

वायरल छायाचित्रांमध्ये सिंगर-अ‍ॅक्ट्रेस रीटा ओरा हसत-हसत आपला बॉयफ्रेंड डायरेक्टर तायका वतितीकडे किससाठी झुकताना दिसत आहे. तर तायका एकीकडे रीटाला किस करताना तर दुसरीकडे टेसाला किस करताना दिसत आहे.

अनेक यूजर्स तिघे एकाच रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवत आहेत. काही लोक या तिन्ही सेलेब्जची ओपन रिलेशनशिप समजत आहेत तर काही कन्फ्यूज आहेत. याच गोंधळामुळे लोक ट्विटरवर मीम्सद्वारे रिअ‍ॅक्शन देत आहेत.

रिपोर्टनुसार, रीटा ओरा, सिडनीमध्ये एका सिंगिंग शोच्या अपकमिंग सीझनसाठी पोहचली आहे, तर तायका तायका वतिती येथे आपल्या अपकमिंग मार्व्हल सुपहिरो फिल्म थॉर-लव्ह अँड थंडरसाठी आला आहे. रीटा आणि तायकाने सिडनीमध्ये रूपॉल्स ड्रॅग रेस डाऊन अंडर चा प्रीमियरसुद्धा एकत्र अटेंड केला.